महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

उरण ( वार्ताहर ): हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील श्री महागणपती चरणी नतमस्तक होण्याचा योग भाविकांसाठी संकष्टी चतुर्थी निमित्ताने रविवारी ( दि. ९) जुळून आला.त्यामुळे श्री महागणपती चरणी नतमस्तक होण्यासाठी नवीमुंबई,ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल,पेण व उरण येथील अनेक भक्तांनी आपआपल्या कुटुंबासह श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

उरण तालुक्यातील चिरनेर या गावावर निसर्ग देवतेची अविरत कृपा आहे.या गावातील जनतेने १९३० साली ब्रिटिश सरकार विरोधात सत्याग्रह पुकारुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी गावकऱ्यांनी हुतात्म्ये पत्करले होते. गावात असणारे महागणपती देवस्थान चिरनेर गावचे ग्रामदैवत आहे. शिलाहार राजवटीत निर्मिलेले महागणपती मंदिर ततत्कालीन मुस्लिम आक्रमकांनी उध्वस्त केले मात्र तत्पूर्वी गणेशभक्तांनी महागणपतीची मूर्ती मंदिरा जवळील तलावात सुरक्षित लपवून ठेवली होती.तद्नंतर पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना देवाने स्वप्नात येऊन मला तलावातून बाहेर काढ असे सांगितले.त्याप्रमाणे त्यांनी तलावाचे खोदकाम करून मूर्ती बाहेर काढली.आणि नविन पाषाणी भव्य मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना केली.महागणपतीचे मंदिर पाषाणी,गोल घुमटाचे असून पूर्वाभिमुख आहे.मंदिरात स्थानापन्न असलेली महागणपतीची मूर्ती भव्य,चतुर्भुज,शेंदूर चर्चित असून पद्मासनात बसलेली आहे.मूर्तीच्या हाती खड्ग व पाश आहेत.मूर्ती सुमारे सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद आहे.

नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर गावातील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे.या गणेशाच्या दर्शनाला व हुतात्म्यांच्या बलिदानातून पावन झालेल्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते, अशा लाडक्या श्रींच्या चरणी नतमस्तक होण्याच भाग्य भाविकांना रविवारी दि ९ एप्रिल २०२३ रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने जुळून आला.त्यामुळे उरण,पनवेल प्रमाणे नवी मुंबई,ठाणे, कल्याण डोंबिवली,पेण मधिल भाविकांनी श्री गणेशाच्या मंदिरात दर्शनार्थ पहाटेच्या सुमारास ये- जा करत होते, यावेळी मंदिरात श्रीचे अभिषेक, सकाळी काकड आरती, भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page