उरण ( नागेंद्र म्हात्रे ): शब्दसम्राट, शब्दाचा जादूगार स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर यांच्या 9 व्या पुण्यतिथी निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा, आवरे येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गोर गरीब विद्यार्थ्यांना परिक्षाकाळात शैक्षणिक पेपर, लिहिण्यासाठी पॅड तसेच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. रत्नाकर गाताडी सर हे निवेदन क्षेत्रातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व होते. भविष्यात त्यांच्यासारखा निवेदक आजच्या विद्यार्थ्यांमधून तयार व्हायला पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक योद्धा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेयेमध्ये प्रथम क्रमांक आराधना राजेश गावंड, द्वितीय पूर्वी प्रमोद म्हात्रे, त्रितीय आकांक्षा अनंत भगत व उत्तेजनार्थ सार्थक चेतन गावंड व कर्तव्य चेतन गावंड या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळलविले. कार्यक्रम प्रसंगी सदर विद्यार्थ्यांना गाताडी सर यांची स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, ज्ञानेश्वर गावंड सर व 1989-90 एस.एस. सी.बॅच ने विशेष पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आवरे गावचे थोर सुपुत्र शिवकुमार गणपत म्हात्रे यांचा विशेष गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आवरे गावच्या प्रथम नागरिक निराबाई पाटील (सरपंच ) दिनेश्वर गाताडी, ज्ञानेश्वर गावंड सर , सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर , सुनिल ठाकूर , विनोद ठाकूर , शिवकुमार म्हात्रे संतोष पाटील (,सदस्य )संजीवन पाटील सर , समता ठाकूर मॅडम , शोभा पाटील मॅडम , राजेश गावंड (अध्यक्ष एस एम सी ) सोमनाथ म्हात्रे (उपाध्यक्ष एस एम सी ) शंकर पाटील( सदस्य) रुपाली चव्हाण , संजीवनी म्हात्रे अलका गावंड , प्रतीक्षा गावंड रत्ना गावंड , सुवर्णा म्हात्रे , स्नेहा म्हात्रे सलोनी म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास गावंड सर यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेचे सह शिक्षक निर्भय म्हात्रे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे सुयश क्लासेस आवरे तर्फे करण्यात आले. तसेच पूर्व तयारी ही रा जि प शाळा आवरे मुख्याध्यापक सहायक शिक्षक व एस एम सी कमिटी ने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली .