उरण ( प्रतिनिधी )

उरण नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच गेली महिनाभरापासून खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. त्याची दखल घेत “नवराज्य”ने घेत वृत्त प्रसिध्द केल्यानंतर, त्वरित नगरपालिका प्रशासनाने दखल घेत खड्डा बुजविला आहे. भर चौकात असणाऱ्या या खड्ड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र खड्डा बुजविण्यात आल्याने नागरिकांनी “नवराज्यचे ” आभार मानले आहेत.


उरण नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच गेल्या महिनाभरापासून पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीसाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. हा खड्डा वर्दळीच्या मार्गावर भर चौकात असल्याने याचा नागरिकांना त्रास होत होता. याची दखल “नवराज्य”ने घेतली आणि सर्वप्रथम “भर चौकात नगरपरिषदेचा खड्डा, महिना उलटूनही दुर्लक्ष” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध होताच नगर परिषद प्रशासनाने याची दाखल घेऊन सदरचा खड्डा बुजवला आहे. यामुळे येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि नवराज्यचे आभार मानले आहेत.