उरण ( प्रतिनिधी )
न्हावे गावची नवसाला पावणारी गावदेवी या परिसरात प्रसिद्ध आहे. सालाबादप्रमाणे मोठ्या जल्लोषात यात्रा व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात कोणताही अनुचित प्रकार न घडता साजरा करण्यात आली.
न्हावे गावची यात्रा व पालखी सोहळा दोन दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी सकाळी गावदेवीची विधिवत पूजा करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करून देण्यात आल्यानंतर, दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी केली होती. यात्रा व पालखी या दिवशी बाहेरगावी असणारे ग्रामस्थ न चुकता गावी येऊन दर्शन घेत असतात. वयाचे भान न ठेवता आबालवृद्ध देखील या यात्रा व पालखीच्या जल्लोषात सामिल झाले होते. यात्रेत विविध प्रकारची खेळण्यांची, मिठाईची तसेच खाऊची दुकाने होती. पालखीच्यावेळी फटक्यांची होणारी आतीषबाजी पहाण्याजोगी होती. न्हावे गावची गावदेवी ही नवसाला पावणारी देवी अशी ख्याती या परिसरात आहे. त्यामुळे नवसपूर्ण करण्यासाठी तर काहीजण नव्याने नवस करण्यासाठी यात्रा व पालखी सोहळ्या दरम्यान मोठी गर्दी करतात. गावदेवीची यात्रा शुक्रवार दि. 7 एप्रिल तर पालखी सोहळा शनिवार दि. 8 एप्रिल 2023 रोजी साजरी करण्यात आला. यावेळी भाविक यात्रा व पालखी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यात्रा व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात कोणताही अनुचित प्रकार न घडता मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष गजानन म्हात्रे व पुजारी डी. डी. पाटील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावातील सर्व पक्षीय प्रतिष्ठित पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या एकोप्यामुळे शक्य झाले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.