उरण ( प्रतिनिधी )
उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद रिक्त होते. त्या जागी समीर वाठारकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सोमवार दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला आहे.
उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निलम गाडे सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यानंतर गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार संजय भोये यांच्याकडे होता. त्यानंतर हा पदभार रजपूत यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यामुळे गेली वर्षेभर उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार हा प्रभारी यांच्याकडे होता.
जव्हार येथील गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांची कायमस्वरूपी नियुक्ती उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी करण्यात आली आहे. त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांनी त्यांचे स्वागत केले.