अलिबाग:-अमूलकुमार जैन
पुलाच्या नूतनीकरणाला अखेर सुरुवात
मुरूड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणारा पू ल हा जीर्ण झाला असल्याने त्याच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मुरूडच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.
मुरूड तालुक्यातील बोर्ली मांडला विभागात असणाऱ्या मांडला, आणि काकळघर या दोन ग्रामपंचायतीना जोडणाऱ्या मांडला पुलामुळे जवळपास पंधरा गावाचा सम्पर्क जवळ आला आहे. हा पूल मांडला ग्रामपंचायत कार्यलयापासून हाकेच्या अंतरावर आहे. ह्या पुलावर मोठमोठे खड्डे पडून तसेच पुलाखालील स्लॅब निखळला आहे. त्यामुळे ह्या पुलाची बिकट अवस्था झाली होती. हा पूल जिल्हा परिषद रायगड यांच्या बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत आहे. ह्या पुलामुळे मांडला ग्राम पंचायत हद्दीतील चार,काकळघर ग्राम पंचायत हद्दीतील आठ गावे तर भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील दोन गावे यांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. गत वर्षी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनेनुसार या पुलावरून अवजड वाहने यांची वाहतूक बंद करण्यात यावी असे फलक या पुलाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आले होते. मात्र ह्या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले नसताना सुद्धा हा पूल धोकादायक कशाप्रकारे ठरविला? असा असा सवाल वेळोवेळी उपस्थित केला जात होता. या पुलावरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसहित ग्रामस्थांना आठ ते दहा किलोमीटर अंतर हे पायी किंवा सायकल वरून पार करावे लागत होते .गत वर्षी गणेशोत्सव काळात मांडला सरपंच सुचिता पालवणकर यांनी मांडला पुलावरील पडलेले खड्डे भरले होते. त्यामुळे या पुलावरून दिवसांपूर्वी बस सेवा ही पुरवत करण्यात आली होती.
रायगडचे तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडला पुलाची तातडीने पाहणी करून त्याचे अंदाजपत्रक बनविण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुरूड येथील झालेल्या अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिले होते.त्यानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडला पुलाची पाहणी सुद्धा केली होती.
मुरूड तालुक्यातील पंधरा गावांना जोडणाऱ्या मांडला पुलाची वाताहात झाल्यानें या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी काकळघर ग्राम पंचायतीच्या सरपंच साक्षी ठाकूर,मांडला सरपंच सुचिता पालवणकर यांच्यासाहित स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने केली करीत होते.
अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी या पुलासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करीत त्यांनी अखेर या पुलासाठी निधी मंजूर करून त्याचे भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी केले होते.आज पासून या पुलाचे जुने बांधकाम पाडून त्याचे नूतनीकरण चे काम हाती घेण्यात आले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.