दिनेश पवार, उरण ( प्रतिनिधी )
येथील ओएनजीसी उरण प्लांट कडून ओएनजीसी सीएसआर फंडातून उरण नगरपरिषदला रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते ही रुग्णावाहिका लोकांर्पण करण्यात आली असून, ही सेवा येथील नागरिकांसाठी महत्वाची ठरणार आहे. या प्रसंगी आमदार महेश बालदी माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे , माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी,नगरसेवक रवी भोईर , उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे , ओएनजीसी चे कार्यकारी निर्देशक सयंत्र प्रबंधक उरण सुभोजित बोस , ओएनजीसी चे जनरल मॅनेजर इनचार्ज भावना आठवले , रवींद्र जोशी मेडिकल फौंडेशन चे संतोष केळकर, नगरसेवक राजेश ठाकूर , प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी यांच्यासाह इतर मान्यवर नगरपरिषधेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते .