उरण ( प्रतिनिधी )
उरण तालुक्यातल्या करंजा गावातील कुलसवामिनी ग्रामदेवता द्रोणागिरी माता आणि शीतलादेवी मातेच्या यात्रा उत्सवला आजपासुन सुरुवात करण्यात आली आहे. चैत्र कालाष्ठमीच्या मुहूर्तावर हा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तर अनेक भाविक नवस फेडण्यासाठी तर काही भाविक नव्याने नवस करण्यासाठी या वेळेस मंदिरात हजेरी लावत असतात. यात्रेवेळी मंदिराला केलेली आकर्षक सजावात मनमोहून टाकणारी असते. तर पालखी सोहळा संपूर्ण गावासाठी महत्वाचा आणि आनंदाचा भाग असतो. यावेळी शोभायात्रा काढण्यात येते. यामध्ये विविधता देखवे तयार करण्यात येतात. ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत निघालेली पालखी गावामध्ये फिरून प्रत्येक भाविकाला शुभआशीर्वाद देते. अशा या यात्रा उत्सावाला सुरुवात झाली असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी समितीकडून विनंती करण्यात आली आहे.