अलिबाग:विशेष प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी यांच्या संयुक्त नावे बंगले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये केला होता.माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तीस महिन्याच्या लढाईनंतर कोर्लई ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांना रायगड गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी दिनांक 10 एप्रिल2023 ताब्यात घेतले.आणि रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
खासदार किरीट सोमय्या हे कोर्लई येथील कथित बंगल्यासंदर्भात कोर्लई ग्रामपंचायत, मुरूड पंचायत समिती, मुरूड तहसील कार्यालय,रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तीस महिन्याच्या कालावधीत अनेकवेळा भेट देत पाठपुरावा केला होता. त्याच प्रमाणे त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोग दिल्ली येथे तक्रार दाखल केली होती.
