उरण, प्रतिनिधी
जीर्ण इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका
उरण शहरातील अनेक इमारतीचे बांधकाम हे ढासळले आहे.त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतीचे बांधकाम हे पडून रहिवाशांच्या व रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतात अशी चर्चा सर्रास नागरिकांमध्ये वर्तविण्यात येत आहे.तरी उरण नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील जीर्ण झालेल्या इमारतीचे आँडीट करावे अशी मागणी जनमाणसातून व्यक्त केली जात आहे.
जीर्ण इमारतींमध्ये आजही राहात आहेत नागरिक
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उरण शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे स्थानिक रहिवासी व परप्रांतीय नागरीक हे मिळेल त्या इमारतीमध्ये आपला संसार किंवा व्यवसाय हा थाटत आहेत.परंतु उरण नगर परिषदेच्या दुर्लक्षित पणामुळे अनेक कुटुंब ही शहरातील जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये आज ही वास्तव करत आहेत.त्यात काही व्यवसायिकांनी आपली दुकाने ही मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थाटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारतीचे बांधकाम ढासळले आणि एखादी दुर्घटना घडली तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागेल अशी भिंती जनमानसात व्यक्त केली जात आहे.
उरण शहरातील धोकादायक इमारतीं संदर्भात उरण नगर परिषद कडे विचारणा केली असता उरण नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे की शहरातील धोकादायक इमारती संदर्भात सोसायटी मधिल रहिवाशांना दरवर्षी नोटीस बजावली जात आहे.परंतु रहिवाशांकडून सहकार्य मिळत नाही.रहिवाशी किंवा व्यवसायिक हे धोकादायक इमारती मध्ये जीव मुठीत धरून वास्तव करत आहेत.