उरण, सुशांत तांडेल
बुधवार दिनाकं 12 एप्रिल 2023 रोजी उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील चौक येथील पाली खुर्द या गावी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला, या सोहळ्यास मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली होती,मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांनी श्री विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन घेतले, तसेच आयोजकांच्या वतीने मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखंड हरिनाम जपयज्ञ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य श्री मोतीराम ठोंबरे , विभागप्रमुख श्री जनार्दन बंदल, शाखाप्रमुख श्री प्रकाश जाधव, निलेश जाधव, दिनेश लबडे, ग्रामस्थ मंडळ, तुळशी महिला मंडळ व नवतरुण मित्र मंडळ उपस्थित होते.