सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील विश्रामगृहा बरोबर रहिवाशी संकुलाची दुरावस्था

उरण, प्रतिनिधी

विश्रामगृह बनतोय टोळक्यांचा अड्डा

सार्वजनिक बांधकाम विभाग उरण या कार्यालयातील विश्रामगृहाची आणि रहिवाशी संकुलाची दुरावस्था झाली आहे.त्यामुळे रहिवाशी संकुलाचा ताबा हा सरपटणाऱ्या प्राण्यांनी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर धूम्रपान आणि माध्यपण करणाऱ्या टोळाक्यांसाठी विश्राम गृह अड्डा बनले आहे.

गेली अनेक वर्षे डागडुजीचे काम झालेच नाही 5

   मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण हा महत्त्वाचा तालुका आहे.या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत.त्यामुळे राज्य, केंद्र सरकार मधिल मंत्रीगण, शासकीय अधिकारी, खासदार,आमदार तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींची रेलचेल ही उरण तालुक्यात असते.अशा महत्वाच्या व्यक्तींना बैठकीचे किंवा बस उठण्याचे ठिकाण हे उरण शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील विश्रामगृह हे आहे.परंतु गेली अनेक वर्षे सदर कार्यालयातील विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने हाती न घेतल्याने सदर विश्रामगृहाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे.  त्यात कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या रहिवाशी संकुलाच्या इमारतीचीही दुरावस्था झाली आहे.सध्या तर या संकुलाच्या आवाराचा ताबा हा सरपटणाऱ्या प्राण्यांनी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर हे विश्राम गृह धूम्रपान आणि मद्यपानासाठीचा अड्डा बनत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील कार्यालयातील विश्रामगृहाच्या इमारतीचे व कर्मचारी संकुलाच्या इमारतीची दुरुस्ती संदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे.त्यामुळे त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे.कामाला मंजुरी मिळाल्यानंतर दुरुस्तीचे काम मार्गी लागणार आहे.परंतु उरण येथील कार्यालयात कर्मचारी वर्गाची संख्या कमी असल्याने तसेच कार्यालयातील रिक्त असलेली पदे न भरली गेल्याने या कार्यालयातील काही अंशी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात पाठपुरावा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कल्पनेश वाडीले शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page