डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कळंबोलीतील सुधागड हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकवर्गाची भव्य रॅली

नवी मुंबई, मनोज भिंगार्डे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या माध्यमातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत 8 हजार पेक्षा अधिक विद्यार्थीवर्ग व 300 पेक्षा अधिक शिक्षक व कर्मचारीवर्ग सहभागी झाले होते. समाजप्रबोधन करण्याच्या हेतूने ही रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी होते त्याच बरोबर विश्वरत्न, तत्वज्ञ, समाजसुधारक अशी डॉ. बाबासाहेबांना संबोधली जाणारी विशेषणे व त्यांचे संदेश लिहून ही रॅली काढण्यात आली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page