उरण, बातमीदार
चिरनेर हे गाव इतिहास प्रसिद्ध गाव असून या गावातील अनेक विद्यार्थी हे देश सेवेसाठी विविध स्तरावर काम करत आहेत.चिरनेर गावातील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शंकर मोकल व माधुरी काशिनाथ मोकल या दांपत्याच्या कुटुंबात जन्मलेल्या हिमाली मोकल हिस लहान पणापासून शेती बरोबर अभ्यासाची ओढ होती.तीने आपले आजोबा शंकर मोकल व आईवडील यांचे शिक्षणक्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अभ्यासाची कास धरली होती.एम.पी.एस.सी परिक्षेत घवघवीत यश संपादित करुन आपल्या आईवडिलांचे स्वप्न हिमाली मोकल हिने पुर्ण केल्याने चिरनेर परिसरातील अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी हिमाली च्या या यशाचे कौतुककेलेआहे.