सुरक्षा साधनांविना कामागारांचा जिव धोक्यात घालून तेल वाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम

उरण, विरेश मोडखरकर

पाईप लाईनच्या डागडुजीचे काम, कामगाराच्या जीवाशी खेळ

       जेएनपिए बंदर आयात निर्यातीच्या व्यवसायामध्ये उत्तुंग झेप घेत असून, प्रत्येक वर्षी या बंदराच्या प्रगतीचा आलेख वर चढत आहे. जेएनपिए बंदराच्या माध्यमातून इतर बंदर देखील व्यापाराचा नवा विक्रम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंटेनर आयात निर्यातीच्या माध्यमातून या बंदरातून  संपूर्ण जगभरात विविध प्रकारच्या मालाचा व्यापार केला जात आहे. यामध्ये तेल आणि विविध प्रकारच्या रसायांनांचा देखील मोठा सहभाग आहे. जेएनपिए बंदरामध्ये तेलाच्या आयात निर्यातिसाठी स्वतंत्र जेट्टीची व्यवस्था करण्यात आली असून, येथे भाडेतत्वावर व्यवसायातून करत असणाऱ्या तेल कंपन्यांना पाईपलाईन द्वारे विविधप्रकारचे तेल बंदरामधून ने-आण करता येते. या पाईपलाईन घातक असून, कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊनये यासाठी वेळोवेळी देखभाल करणे बंधनकारक आहे. यासाठी सातात्याने या पाईपलाईंची डागडुजी करण्यात येते. सध्या अशाचप्रकारे तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईंच्या डागडुजीचे काम सुरु आहे. मात्र सदरचे काम हे कामगाराच्या जीवाशी खेळ करणारे असल्याचे दिसून येत आहे. घातक आणि ज्वलनशील असणाऱ्या या पाईपलाच्या वेल्डिंगाचे काम करणारे कामगार सुरक्षा साधानांनविनाच काम करत आहेत. होत असलेले वेल्डिंगच्या कामातून तीणगी पडून एप्रिय घडून त्यामध्ये कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जावबदार कोण? असा सवाल याठीकाणी निर्माण होतं आहे. याबाबत कामगारांना  विचारणा  केली असता, ठेकेदार ज्या परिस्थितीमध्ये काम करायला सांगेल त्या परीस्थितिमध्ये काम करावे लागते. पोटासाठी काम तर हवेच ना? असे उदगार काढून नाईलाजास्तव जीवावर उदार होऊन काम करावे लागत असल्याचे कामगारांनी  नाव न सांगता सांगितले. यामुळे ठेकेदार आपल्या कामगारापेक्षा आपल्या नफ्याकडे जास्त लक्ष देत असून, या नफ्यासाठी कामगारांच्या जीवाशी खेल करत असल्याचे आता समोर येत आहे.

सुरक्षा साधनांविना अनेक मजुरानी जीव गमावला

     उरण तालुक्यात होत असलेल्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे राहात आहेत. तर सिडकोच्या माध्यमातून नवनवीन वसाहत देखील तयार होतं आहेत. मात्र या विकास कामांसाठी काम करणाऱ्या मंजूर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, या विभागात सुरक्षा साधनांविना अनेक मजुरानी आपला जीव गमावला असतानाही सुरक्षा साधनांचा वापर विकासक अथवा ठेकेदार यांच्याकडून होत नसल्याने, कामगाराच्या जीवाशी खुलेआम खेळ सुरु असल्याचे स्पष्ट होतं आहे. 
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page