दिवेआगर, प्रतिनिधी ( संतोष रेळेकर )

ग्रामपंचायत कार्यालय दिवेआगर मध्ये 5 टक्के दिव्यांग अर्थ सहायय निधी तरतुदीतून दिवेआगर मधील 27 दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 5 हजार 595 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. मागील चार वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींना धनादेशाचे वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश कोसबे, ग्रामसेवक शंकर मयेकर, सदस्य राकेश केळसकर, सदस्या नेहा पाटील, तृप्ती चोगले, श्रुती कोसंबे, मोहिता कोसंबे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष देवेंद्र नार्वेकर उपस्थित होते. सरपंच सिद्धेश कोसबे यांच्या हस्ते उपस्थित दिव्यांगांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत दिवेआगार दिव्यांगांच्या सबलीकरणासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम करत असतात.