सुशांत तांडेल, प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर व एम आय पी एल कंपनीचे व्यवस्थापक दयाळ भोईर यांच्या माध्यमातून नवीन शेव्याची ग्रामदेवता श्री शांतेश्वरी देवीसाठी चंदनाची पालखी अर्पण करण्यात आली. ही पालखी कर्नाटक मधून बनवून आणण्यात आली आहे. या चंदनाच्या पालखीची अर्पण मिरवणूक काढून, श्री शांतेश्वरी देवीच्या यात्रा-पालखी सोहळ्या वेळी शुक्रवार दिनाकं 14 एप्रिल 2023 रोजी ब्रास बँड च्या तालावर नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाच्या पदाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. काही वर्षांपूर्वी मनोहर भोईर यांच्यातर्फे श्री शांतेश्वरी देवीसाठी चांदीची पालखी अर्पण करण्यात आली होती, आता शांतेश्वरी देवीला चंदनाची पालखी अर्पण केल्याने नवीन शेवा ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार मनोहर भोईर ,एम.आय.पी.एल. कंपनीचे व्यवस्थापक दयाळ भोईर, उघोगपती नारायण भोईर, भालचंद्र भोईर व सतीश भोईर यांचा सत्कार करून आभार मानले आहेत. सदर वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.