उरण, प्रतिनिधी
उरणच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या विमाला तलाव परिसरात तरुण, तरुणीच्या अश्लील चाळ्यांना उत आला आहे. यामुळे येथे पर्यटनाला तसेच जॉगिंगला येणाऱ्यांना मां खाली घालावी लागत आहे. तर रात्रीच्यावेळेस मध्यपी येथील अंधाऱ्या जागावर परत्या झोडून रिकाम्या झालेल्या बिअरच्या बाटल्या थेट तलावाच्या पाण्यात फेकत आहेत. यामुळे या धेंडानां आवर घालणार कोण? असा सवाल विचारला जात आहे.
उरण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे विमाळा तालाव हे उरणच्या सौंदर्यात भर टाकणारे असून, या तलावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुतळा स्थापित असल्याने, शिवप्रेमींसाठी हे ठिकाण पवित्र आहे. तर या तलावाभोवती नगरपरिषदेने जॉगिंग ट्रॅक बनवला असल्याने, शहरातील जेष्ठ नागरिकांसह तरुणवर्ग देखील येथे जॉगिंगसाठी येत असतात. त्याचप्रमाणे तालावाला लागून सानेगुरुजी बालोद्यान असल्याने, पालक आपल्या मुलांना घेऊन उद्यानात येत असतात. याठीकाणी जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी नाना-नानी पार्क तयार करण्यात आले होते. या पार्कमध्ये बसण्याची व्यवस्था, पालणे विविध प्रकारची शोभेची झाडे तसेच पायाखाली उत्तम दर्जाचे गवतही लावण्यात आले होते. तर या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रसाधान गृहची सोय देखील करण्यात आली होती. मात्र येथे काही उनाडटप्पू मुलांनी आपला अड्डा बनवला असून, येथील काही कोपऱ्यांना धूम्रपानासाठी वापरात आणले जातं आहे. तर अंधार पडताच या कोपऱ्यांमध्ये अश्लील चाळ्यांना ऊत येत आहे. वेळ झाली की या परिसराचे दरवाजे बंद करण्यात येतात. मात्र काही चोरवाटांमधून प्रवेश करून, विमाळा तालाव परिसरातील कोपऱ्यांमध्ये मध्य पार्ट्या सुरु होतात. महत्वाचे म्हणजे या पार्ट्या संपल्यावर रिकाम्या बिअरच्या बाटल्या तलावाच्या पाण्यात फेकून देण्यात येत आहेत. यामुळे सकाळी पर्यटनाला अथवा जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांना पाण्यावर तरंगणाऱ्या बियरच्या बाटल्या पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अशाप्रकारे अश्लील चालेल आणि मद्य पार्ट्या होत असल्याने, या ठिकाणाचे पवित्र्य नष्ट होत असल्याने, याला आळा कोण घालणार? असा सवाल शिवप्रेमी करत आहेत. तर येथे येणाऱ्या जेष्ठ नागरिकांनाही होत असणाऱ्या अश्लील गोष्टींमुळे मां खाली घालावी लागत आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
बातमी आवडली असल्यास शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका…