उरण, प्रतिनिधी
महानिर्मिती वायू विद्युत केंद्र उरण येथे महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेच्या शाखा युनिटची स्थापना मनसेचे नेते तथा युनियन अध्यक्ष शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मनसेच्या कामगार युनियनच्या वतीने प्रयत्न केले जातील असे अभिवचन युनियन अध्यक्ष शिरीष सावंत यांनी उपस्थित कामगारांना दिले.

महानिर्मिती वायू विद्युत केंद्रातील कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यात प्रकल्पातील अंतर्गत असलेल्या युनिय मात्र ठेकेदारीत गुंतल्या असल्याने,तेथील कामगारांना न्याय मिळत नसल्याने, कामगारांच्या न्याय हक्कासाठी बुधवारी ( दि १९) महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेच्या शाखा युनिटचे उद्धघाटन मनसेचे नेते तथा युनियन अध्यक्ष शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वायू विद्युत केंद्रांचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील इंगळे ह्यांना मनसे नेते तथा युनियनचे अध्यक्ष शिरीष सावंत यांनी पत्र देताना कामगारांच्या समस्या लवकरच संपवून टाकाव्या अशी मागणी केली.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर , युनियनचे सरचिटणीस संतोष तारी , उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, युनिट अध्यक्ष दत्ता सुळे , द्रोणागिरी शहरध्यक्ष रितेश पाटील, उपतालुकाध्यक्ष राकेश भोईर, दिपक पाटील, निलेश ठाकूर महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे भांडुप , कल्याण , वाशी येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स जरूर करा…….