उरण, प्रतिनिधी
त्याचं खोड्या, तीच मज्जा आणि तीच मस्ती अनुभवता आली.
तब्बल 41 वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या दहावीच्या बॅचमधील मित्र, मैत्रिणींनी आपल्या भूतकाळातील आठवणींना उजळा देत पुन्हा तरुण होण्याचा आनंद घेतला. यावेळी एकमेकांनी केलेल्या प्रगतीचा आढावा देखील घेतला. यातील काहीनी सुरेल आवाजचा जादु सादर केली, तर काहींनी आणलेल्या मिठाईने सर्वांचे तोंड गोड करून, नव्या आठवणींना संग्रहित करण्याचा प्रयत्न केला. त्याचं खोड्या, तीच मज्जा आणि तीच मस्ती पुन्हा एकदा अनुभवता आली.
जुन्या आठवणी डोळ्यात येऊन डोळे पाणावले होते.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पिरकोनमध्ये 1982 साली दहावीमध्ये शिकलेल्या वर्गामधील बॅचने एकत्र येत पुन्हा एकदा तोच कल्ला करून, तरुण झाल्याचा अनुभव घेतला आहे. सोशलमीडिया किती प्रभावशाली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सोशल मीडियाचा वापर नेहमीच वेळ वाया घालविण्यासाठी होत नसून, काही विधायक कामांसाठी देखी उत्तम प्रकारे होऊ शकतो. जुन्या आठवणीनां उजळा देण्यासाठी देखील याच सोशल मीडियाचा वापर आज केला जात आहे. फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून जुन्या मित्र, मैत्रिणींचा किंवा नातेवाईकांचा शोध आज घेता येतं आहे. अशाच प्रकारे 1982 च्या दहावी बॅच मधील मित्र, मैत्रिणींचा शोध घेऊन, व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला. यांनंतर सर्वांनी एकत्र भेटण्याचे ठरले, आणि नियोजित ठिकाणी, नियोजित वेळेत सर्वजण एकत्र आले. 41 वर्षानंतर सर्व काही वेगळे होते, पण मनात साठवून ठेवलेल्या जुन्या आठवणी डोळ्यात येऊन डोळे पाणावले देखील होते.
खूपसाऱ्या गप्पा, गोष्टी, शाळेतील धम्माल, मज्जा, मस्ती आणि मेल-फिमेल सिंगर मनोहर फुंडेकर यांच्या आवाजच्या जादूने कार्यक्रमाला आणखी उभारी आली होती. यावेळी काहीनी आपल्या आवाजची जाडू सादर केली, तर काहीनी मिठाईने सर्वांचे तोंड गोड केले. काहींच्या खोड्या पुन्हा पहायला मिळाल्या तर काहींना भावना अनावर झाल्या होत्या. एकंदरीत 41 वर्षांनी एकत्र येऊन भूतकाळातील आपल्या आठवणींना उजळा देत, पुन्हा एकदा तरुण झाल्याचा अनुभव घेतला. याच आठवणी भविष्यातील येणाऱ्या दिवसांसाठी नवं जीवन जगण्याचा आनंद देणाऱ्या आहेत.