अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष जनार्दन नाईक यांचे पुनश्च उपोषण सुरू

अलिबाग, अमूलकुमार जैन

पनवेल-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ / १७ च्या सन २०११ ते २०२३ पर्यंतच्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत तसेच ग्रामीण भागात कायद्या प्रमाणे घटक (२) असून, घटक (१) प्रमाणे तसेच १.५ प्रमाणे मोबदला देऊन्न भ्रष्टाचार झाल्याबाबत, तसेच ३ महिन्यात हद्द कायम करू. परंतु हद्द कायम आज पर्यंत न करण्यात आली नाही तसेच कुटूंबियांच्याकडून जबरदस्तीने सह्या घेऊन, जीवे मारण्याचा कट केला होता. त्यासाठी उपोषणाला बसलो असताना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडले.मात्र प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्याने अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुनश्च उपोषणास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष जनार्दन नाईक यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अध्यक्ष जनार्दन नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पनवेल – इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६/१७ रुदीकरणामध्ये सन २०११ ते २०२३ पर्यंतच्या भूसंपादनात उप विभागीय भूसंपादन विभाग पेण अधिकान्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. सन २००९ ते सन २०१३ पर्यंत केवडी कवडी मोलाने । 3 APK सतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करून घेतल्यानंतर सन २०१३ च्या कायद्याप्रमाणे भूसंपादन करताना वाढीव भाव देणे आहे. (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) घटक (१) ने मोबदला दिला. परंतु उर्वरित भूसंपादनाबाबत ते कर्तव्यात कसूर करत आहेत.महसूल सहाय्यक तसेच (मंजूर रायगड प्रादेशिक योजना) म्हणजे ग्रामीण भागात घटक (२) ने मोबदला रक्कम जमिनी किंवा इमारतीना देणे आवश्यक होते. परंतु शेतकऱ्यांना तुच्छ, वेडे व अनाडी समजून काहींना घटक (2) तर काहींना घटक (१) ने, तर काहींना घटक (१.५) ने, तर काहींना घटक (२) ने मोबदला दिला. याचे पुरावे भी अर्जासोबत जोडत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या मोबदल्यात भ्रष्टाचार झाला आहे. म्हणून अशी फसवणूक व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. तसेच सन २०१५ ला हद्द कायम पंधरा दिवसांच्या आत करण्यात येईल परंतु अद्याप झाली नाही.दिनांक ०३/११/२०२२ रोजी पुन्हा पत्र देऊन तीन महिन्यांच्या आत हद्द कायम करू असे दोन वेळा लेखी पत्र दिले, परंतु अद्याप हद्द कायम झाली नाही. तसेच लेखी पत्राद्वारे मला सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पेण येथील विठ्ठल इनामदार यांनी धमकी दिली की, तुम्ही पुन्हा उपोषणास बसलात तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. कारण काय? सांगतात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम काय निर्माण करून वारंवार आंदोलन व उपोषण यांसारख्या गोष्टी आचरणात आणून शांतता व सुव्यवस्था निर्माण करून दिशाभूल करता, शेतकऱ्यांवर अन्याय करून फसवणूक करुन, आमल शेतकऱ्यांची दिशाभूल करून सन २०१३ च्या कायद्याने (मंजूर रायगड प्रादेशिक योजना) या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीला / इमारतींना घटक (२) ने मोबदला रक्कम देणे आहे. तसेच वनस्पती, झाडे तसेच, भर पिकांना १०० % दिलासा रक्कम, अतिरिक्त १२ % व्याज दर.वरील सर्व गोष्टींना कलम (४) च्या पोट कलम (२) अन्वेय सामाजिक आघात म्हणून देणे आवश्यक आहे. तरी आपण माझ्यावर आरोप करत आहात. सदर ह्या गोष्टी माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे निदर्शनास आणून दिले. तरी देखील टोलवाटोलवीची उत्तरे देऊन, कर्तव्यात कसूर करीत आहेतत. जर २० दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मोबदला रक्कम मिळाली नाही तर दिनांक २०/०४/२०२३ पासून अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर मा. सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, विठ्ठल इनामदार उपविभाग पेण यांच्या विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत.

मागील उपोषण दिनांक ०३/११/२०२२ रोजी. दिनांक ०७/११/२०२२ यादिवशी माझी पत्नी व माझी मुलगी यांच्या कडून जबरदस्तीने रात्री ९.०० च्या सुमारास उपोषण सोडण्याबाबत जबरदस्तीने सह्या घेतल्या तसेच त्याला कारण म्हणजे माझा उपोषण करून मृत्यू झाल्यास, तर माझ्या कुटुंबाला संभ्रमात ठेवून मला जीवे ठार मारण्याचा कट केला होता. ते माझ्या लक्षात आल्यानंतर रात्री १०.०० ते १०.३० वाजता मा. सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पेण विठ्ठल इनामदार यांनी माझ्या जवळ येऊन जबरदस्तीने, पोलीसाचा धाक दाखवून माझे उपोषण सोडायला लावले. याची व्हिडिओ क्लिप माझ्या जवळ आहे. सदर सुरू असलेले उपोषण शांततेने पार पाडील, तरी माझ्या जीविताची हानी झाली व माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यास, तर त्याला जबाबदार मा. सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पेण विठ्ठल इनामदार हेच असतील. असेही जनार्दन शिवराम नाईक यांनी सांगितले.

वरील विषया सबंधित केलेल्या बाबी शासनाच्या जी.आर प्रमाणे कायदेशीर देणे क्रमप्राप्त असताना सुद्धावशेतकऱ्यांसाठी लढत असून मला मानसिक व आर्थिक देऊन, टोलवा टोलवा करून, कर्तव्यात कसूर करत असून या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची व विनंती जनार्दन शिवराम नाईक यांनी केली आहे.

बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page