प्लास्टिक संकलनाचे अंतरिम व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत काशिदचा पुढाकार

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध नयनरम्य समुद्र किनारा लाभलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता सुविधेच्या दृष्टीने जिल्हा स्वच्छता कक्षाकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी येथील सर्व स्टॉल धारक प्रतिनिधी, कॉटेज प्रतिनिधी, हॉटेल संघटना प्रतिनिधी, कचरा व्यवस्थापक ठेकेदार, काशिद ग्रामपंचायतीच्या सरपंच नम्रता कासार, उपसरपंच वर्षा दिवेकर, सदस्य संतोष राणे, विलास मोरे, सदस्या मयूरी धारवे, सौ.तुलसा पवार, इतर मान्यवर नरेश मरवाडे, अमित खेडेकर, विलास दिवेकर, ग्रामसेवक सुशांत ठाकूर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि मान्यवर ग्रामस्थ सी.आर.पी, मुख्याध्यापक, बचतगट अध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली.

प्लास्टिक संकलन व त्याचे अंतरिम व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती व आम्ही संस्था यांनी भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रत्येक घटकाची असणारी जबाबदारी याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. होते. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.जयवंत गायकवाड, श्री. रविकिरण गायकवाड आम्ही संस्थेच्या श्रीमती परेरा, श्रीमती किरण पटेल यांनी प्लास्टिक मुक्त शाळा, निर्मल बचतगट, टाकाऊतून टिकाऊ, लोकसहभागातून प्लास्टिक मुक्ती आदी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती मुरुडचे वि.अ. श्री.सुभाष वाणी, श्रीप्रसाद माळी, श्री.वाडेकर, श्रेया गदरे, समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलधारक यांनी नियमित ओला व सुका कचरा वेगळा करून देणे, श्रमदानातून समुद्र किनारा स्वच्छता यामध्ये सहभाग तर कॉटेज व रिसॉर्ट संघटनेने त्यांचे ओल्या कचऱ्याचे कंपोष्ट खत खड्याद्वारे व्यवस्थापन करणे तर तेथील प्लास्टिक आम्ही संस्था यांनी ग्रामपंचायतीकडे देण्याबाबत पुढाकार घेतला. बचतगटांनी प्लास्टिक संकलनात सहभाग देण्याबाबत आश्वासित केले.

काशिद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनखाली प्लास्टिक व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत मिशन मधून रु.16 लाखाचा प्रकल्प मंजूर केला आहे. हा प्रकल्प ग्रामपंचायत,पंचायत समिती व आम्ही संस्थेच्या सहाय्याने चालणार आहे.

बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page