उरण, ( वैशाली कडू )
उरण तहसीलदार पदी उद्धव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची बदली झाल्याने गेली अनेक दिवसांपासून हे पद रिक्त होते. त्यामुळे कामकाजाला खीळ बसली होती. रिक्त असलेले तहसीलदार पदी कोणाची नियुक्ती होते याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले होते. गेली अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या तहसीलदार पदी उद्धव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच कदम यांनी पदभार स्वीकारला आहे. आपण उरणच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास नवनिर्वाचित तहसीलदार उद्धव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.