बातमीदार, सुशांत तांडेल
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वांनाच माहीत आहे, त्याचे आणखी एक उदाहरण पहायला मिळाले आहे. धाकटी जुई येथील अस्थमा पेशंट नरेश बापू घरत ह्या पेशंटला दोन वर्षापासून दम्याचा त्रास आहे. सतत दोन वर्ष हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. कधी कधी महिन्यातून पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागत असे. त्यांची पहिली ट्रीटमेंट जे. जे. हॉस्पिटलला होती तेव्हा त्यांचे ब्लॉकेज काढण्यात आले, आणि नंतर पनवेल येथील धर्माधिकारी हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. तेथील डॉक्टरांनी त्यांना पेशंटची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्यांना कायमस्वरूपी ऑक्सिजन मशीन लावायला लागणार असल्याचे सांगितले. 24 तासातून जवळ जवळ चार वेळा मशीन लावायची तर चार तास आराम, मशीन विकत अथवा भाड्याने घेणे परवाडणारे नव्हते. अखेर रुग्णाच्या नातेवाईकनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडे या ऑक्सिजन मशीन साठी मागणी केली, आणि त्यांनी त्वरित ही मागणी मान्य करून, ऑक्सिजन मशीन स्वतः विकत घेऊन नरेश बापू घरत यांना भेट दिली. मनोहर भोईर यांचे रुग्णाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ्यांनी आभार मानलेली.