अलिबाग, प्रतिनिधी
भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ''रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम'' दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी मुख्या कार्यालय सहाण-अलिबाग या ठिकाणी कौशल्य दीक्षांत समारंभाच्या आयोजन करण्यात आला व माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यात आली.
समाजातील तळागाळातील निरक्षर, अपूर्ण खंडित शिक्षण झालेल्या व जे.एस.एस. रायगड च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला, दुर्लक्षित प्रशिक्षणनार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी, शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळावे, तसेच उच्च पदवी प्राप्ती वातावरण निर्मितीचे स्वरूप त्यांना कळावे या उद्देशाने सदर समारंभाचे स्वरूप दीक्षांत समारंभा सारखे करण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जे.एस.एस. रायगड चा कौशल्य दीक्षांत सोहळा अनोखा उपक्रम'' उत्साहात संपन्न झाला.जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान सातत्याने होत आहे असे मत डॉ.मेधा सोमैया यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.