अलिबाग, अमूलकुमार जैन

दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीवर्धन या न्यायालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, जिल्हा. रायगड श्री.मिलिंद म.साठ्ये यांच्या शुभहस्ते व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड – अलिबाग श्रीमती शैलजा श.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता संपन्न झाला. सध्या श्रीवर्धन येथील दिवाणी न्यायालय भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागी सुरू असून, सुमारे ३० ते ३५ वर्षे श्रीवर्धन न्यायालयाची स्वतंत्र वास्तू उभारण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू होते. दि.२६ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून श्रीवर्धन येथे न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार तळमजला अधिक दोन मजले अशी ३५११.८० चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची न्यायालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. यावेळी श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार अदिती तटकरे यांची उपस्थिती होती.
आपल्या विभागातील ताज्या घडामोडी इतरांपर्यंत पोहचवण्यासाटी “नवराज्य” न्यूज पोर्टल लिंक शेअर करा आणि कमेंट्स देखील जरूर करा ….