उरणमध्ये गुटखा पुरवणाऱ्या बड्या धेंडांवर कारवाई नाहीच

शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपर्यंवार कारवाई नाही

उरण, विरेश मोडखरकर

राज्यामध्ये गुटखा बंदी असताना उरण तालुक्यामध्ये सर्रास गुटखा विक्री केली जातं आहे. तालुक्यातील टपाऱ्यांवरून दिवसाढवळ्या गुटखा विक्री होतं असल्याचा खुलासा उरण शहरातील काही टपऱ्यांवर झालेल्या कारवाईतून झाला आहे. या कारवाईदरम्यान गुटखा विक्री करणाऱ्या टपाऱ्या सील करण्यात आल्या असून, चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र टपाऱ्यांवर गुटखा पुरवणाऱ्या मोठ्या धेंडांवर अजूनही कारवाई झालेली नाही. यामुळे गुठाखा पुरवठा करणाऱ्या या मोठ्या माशांनाच जाळ्यात घेण्याची मागणी जोर धरूलागली आहे.

संदर्भासाठी वापरण्यात आलेला फोटो, सौजन्य-गूगल

नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का?

  उरण तालुका विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना, अनेक दुष्ट प्रवृत्तीनाही चालना दिली जात आहे. शहराच्या नियोजनाची जावबदारी नगरपरिषदेचे तर सुरक्षेची जावबदारी पोलीस यंत्रणेची आहे. सध्या नगरपरिषद हद्दीमद्धे बेधडकपणे टपऱ्यांचे  जाळे तयार होत आहे. शहरातील कोणत्याही मोकळ्या जागी या टपऱ्या  उभ्या केल्या जात आहेत. तर काही टपऱ्या चक्क रस्त्यावरच उभ्या करून, व्यवसाय थाटला जातं आहे. या अवैद्य टपऱ्यांच्या माध्यमातून सर्रासपणे गुटखा तसेच नशेची इतर साधने विक्री केली जातं आहेत. अन्न आणि पुरवठा प्रशासनाकडून झालेल्या कारवाईतून हे या आधीच स्पष्ट झाले आहे. या कारवाईदरम्यान काही टपऱ्या सील करण्यात आल्या होत्या. यातील काही दुकाने अटी-शर्थिंवर सुरु करण्यास पर्वागी देण्यात आली आहे. मात्र आज उरणच्या रस्त्यावर अनेक टपऱ्या गुटखा्यासह अन्य नशेचे पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळत आहे. शाळा, रुग्णालंय, न्यायलंय, मंदिरे यांसारख्या ठिकाणापासुन शंभर मिटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे नशेचे पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र आज याच ठिकाणी बेधडकपणे नशेचे पदार्थ आणि बंद असलेला गुठका विक्री केला जात आहे. याकडे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष का? असा सवाल निर्माण होत आहे.

संदर्भासाठी वापरण्यात आलेला फोटो, सौजन्य-गूगल

गुटख्यासहीत इतर नशेचे पदार्थ टपऱ्यांवर पुरवणाऱ्या बड्या धेंडावर कारवाई का नाही?

    तालुक्यामध्ये सर्वत्र टपऱ्यांचे जाळे पसरले आहे. शहरापासुन, ग्रामपंचायात, सिडको हद्दीमध्ये टपऱ्यांच्या माध्यमातून नशेचे पदार्थ विक्री केली जात आहे. यावर कारवाईसाठी आवाज उठविल्यास छोट्या, मोठ्या टपऱ्यांनवर कारवाईचा बडगा उचलला जातो. मात्र या टपऱ्यांवर नशेचे पदार्थ पोहचवणाऱ्या मुख्य धेंडावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. यामुळे या सप्लायर्स असणाऱ्या बड्या धेंडावर कारवाई का होत नाही? असा सवाल निर्माण होत आहे. तर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तंबाखुमुक्त शाळा अभियान राबाविण्यात येत आहे. शाळेच्या शंभर मिटर अंतराच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून कारवाई होणे गरजेचे आहे. ही कारवाई होत नसल्याने, विद्यार्थ्यांमध्ये व्यसन बळावण्याची शक्यता अधिक आहे.

कौशिक ठाकूर सर
आदर्श शिक्षक

उरणमध्ये शाळांच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कोणतीच कारवाई आजवर झालेली नाही. यासंदर्भातील जी. आर. पहावा लागेल. कारवाई संदर्भात पावलं उचलण्याबाबत विचार करण्यात येईल.

हरेश तेजी
आरोग्य विभाग, नगरपरिषद

बातमी आवडल्यास शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा …..

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page