उरणला सीसीटीव्ही ची गरज; मुख्यमंत्री शिंदेंनी शासकीय पातळीवर निधी उपलब्ध करण्याची उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

उरण, घन:शाम कडू

उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. यामुळे उरणचा चेहरामोहरा पूर्णपणे बद्दलताना दिसत आहे. त्यातच उरणमध्ये परप्रतियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुन्हेगारीचे प्रमाण ही वाढणार आहे. यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस यंत्रणेची शक्ती अपुरी पडणार आहे. याचा सारासार विचार करून, उरण शहरात व तालुक्यातील प्रत्येक गावाभोवती सीसीटीव्ही शासकीय पातळीवर निधी उपलब्ध करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

फोटो-सौजन्य गूगल

उरणचा चेहरामोहरा बदलत असतानाच जेएनपीए बंदराबरोबर, डीपीवर्ल्ड, जीटीआय, बीपीसीएल,सिंगापूर पोर्ट, एनएडी, ओएनजीसी आदींची निर्मिती झाल्याने, आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी उरण परिसरात कंटेनर यार्डचे जाळे विणले गेले. त्यामध्ये काम करणारा कामगारवर्ग हे स्थानिकांपेक्षा परप्रतियांचा जास्त आहे. तसेच लवकरच रेल्वे व नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची उभारणी झाल्याने उरणचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. याचबरोबर या परिसरात पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. हे सर्व सुरू झाल्यानंतर पोलीस ठाण्यात वाढ केली नाहीतर पोलीस यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतर उरणची शांतता बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने, या परिसरात वास्तव्यासाठी परप्रतियांचा मोठ्या प्रमाणात भरणा झाला आहे. यातील काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. वाढत्या विकासाबरोबर शांतता सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढते अपघात, चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून हाणामारी अशा घटनांमध्ये वाढ होणार आहेत. या घटना घडल्यानंतर कोणताही ठोस पुरावा पोलीस यंत्रणेला मिळत नसल्याने गुन्हा उघड होण्यास विलंब होतो किंवा तपासही लागत नाही. यामुळे नागरिकांचा रोष पोलीस यंत्रणेवर राहतो. हे सर्व टाळण्यासाठी किंवा याला आळा घालण्यासाठी उरण शहराबरोबर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये गावात व गावाभोवती सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक बनले आहे. सीसीटीव्ही बसविल्यानंतर एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्यामागचे सूत्रधार व आरोपीना लवकरात लवकर जेरबंद करणे शक्य होईल, त्याचबरोबर अशा घटनांना आळा घालता येईल. याचा सारासार विचार करून शासकीय यंत्रणेने सीसीटीव्ही बसविण्यासाठी शासकीय पातळीवर निधी उभा करावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…..

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page