रेवदंडा, प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत शेतीसाठी तक्रारदार शेतकरी याला शेड तयार करायची असल्याने त्याने उसरोली ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता.सदर परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभाग रायगड ने रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी यांना त्यांच्या शेतात शेड तयार करण्यासाठी उसरोली ग्रामपंचायत कडे अर्ज दाखल केला होता.मात्र सदर तक्रार दार शेतकरी यास शेड तयार करणे गरजेचे होते.त्याने सरपंच मनीष नांदगावकर यांनी सदर शेड च्या परवानगीसाठी लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे केली. लाच लुचपत विभागाचे उपअधीक्षक पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सरपंच मनीष नांदगावकर याला ग्रामपंचायत कार्यालायत पन्नास हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे.