पनवेल, प्रतिनिधी
पनवेलकडून महाडला जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात होऊन बस जागेवर पलटी झाल्याने, बासमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 18 प्रवाशी जखमी आहेत. तर यातील 3 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या या मार्गवरील वाहतूक रोखून ठेवण्यात आली होती.

पनवेल आगारामधून महाड कडे निघालेली शिवशाही बस कर्नाळा खिंडीमध्ये नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. झालेल्या या अपघातामध्ये जबर मार लागल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर तीं प्रवाशी गंभीर जखमी आहेत. एकूण 18 प्रवाशी जखमी असून, सर्व जखमिंना कळंबोली एमजीएम आणि पनवेल ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी हळविण्यात आले आहे. अपघात स्थळावरून बस सुरक्षित ठिकाणी हळविण्यात आली आहे. तर अपघातानंतर काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. अपघातावेळी रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे आणखी अपघात होऊनये, यासाठी सिडको अग्निशमन दलाकडून रस्त्यावर पाणी मारून रस्ता साफ करण्यात आले. पोलीस प्रशासनाने लागलीच घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत रस्ते वाहतूक सुरु करण्यासाठी सहकार्य केले.