बोर्ली मांडला, अमूलकुमार जैन
घराजवळ भटका कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना नागाव येथे घडली आहे. चिमुकलीच्या अशा करुण अंतामुळे संपूर्ण नागाव ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत.

स्वरा वैभव घाडी असे या मुलीचे नाव आहे. नागाव हायस्कूल समोरील माद्रेकर वाडी येथे ती राहते. चौथी इयतेत ती शिकत होती. तिच्या घरासमोरच काही दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने केलेल्या दंशामुळे तिला जखम झाली होती. त्यावरचे उपचार घेत रेबीजचे लसीकरण देखील तिने पूर्ण केले होते. मात्र तिला जास्त त्रास होत असल्याने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात तिला हलविण्यात आले होते. तथापि उपचाराला साथ न दिल्याने तिचा मृत्यू झाला.