उरण, प्रतिनिधी
हवामानातील उष्मा वाढल्याने, नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून वेगवेगळे उपाय करण्यात येतं आहेत. तर प्रशासनाकडून देखील उष्माघाताचा त्रास होऊनये यासाठी काय खबरदारी घ्यावी याची माहिती देत आहे. तर उष्माघाताचा त्रास माणसाप्रमाणेच पशु पक्षांनाही होत आहे. अशाच एक घार पक्षी उष्माघाताने पडला असता, “फ्रेंड्स ऑफ नेचर” या संस्थेच्या सदस्यांने या पक्षाचे प्राण वाचवले आहेत.

उरणमधील नवघर येथे असणाऱ्या जीडीएल, सीएफएस मध्ये घार एक पक्षी उष्माघाताने अशक्त होऊन पडला असल्याची माहिती "फ्रेंड्स ऑफ नेचर" या संस्थेला मिळताच, संस्थेचे सदस्य निकेतन ठाकूर यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पहाणी केली. यावेळी घार हा पक्षी संरक्षित प्रजातिमधील असल्याने याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. तर लागलीच या पक्षाला ताब्यात घेऊन सुरक्षित केले आहे. पक्षावर उपचार करून, त्याच्या प्रकृतिमध्ये सुद्धारना झाल्यावर नैसर्गिक आवासामध्ये सोडण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जैवंत ठाकूर यांनी गितले आहे.