उरण, प्रतिनिधी
गस्तनौकवरील राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत आढळल्याने तक्रार दाखल
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय गस्त नौकवरील राष्ट्रध्वज फटालेल्या अवस्थेमध्ये आढळल्याने, संबंधित अधिकाऱ्यांवर राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करून, तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. गस्त नौका उरणच्या करंजा बंदरामध्ये उभी असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मत्स्यव्यावसाय अधिकारी मात्र हात वर करत असताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा लाभला असल्याने, येथील किनारी भागामध्ये मोठ्याप्रमाणात मत्स्यव्यावसाय केला जातो. यामुळे येथील किनारी भागामध्ये कोणताही अनुचित प्रकार अथवा मासेमारी संदर्भातील नियम भंग होऊनये यासाठी समुद्रामध्ये गस्त घालण्यात येते. यासाठी गस्त नौका देण्यात आल्या आहेत. अशाच "मत्स्य प्रबोधिनी" नामक गस्त नौकेवर लावण्यात आलेला राष्ट्रध्वज फटालेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकारणी जिल्हाधिकारी रायगड, उरण तहसील कार्यालय, उरण पोलीस ठाणे, नवीमुंबई आयुक्तालय यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील करंजा बंदरात ही गस्त नौका उभी असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अधिकारी यांनी बोटीवर लावण्यात आलेल्या राष्ट्रधवाजाची काळजी न घेता त्याची दुरावस्था झाली असताना देखील ध्वज बोटीवरून काढला नाही, म्हणून संबंधित अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून, निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी फिशरमन काँग्रेसचे कोकण विभागय उपाध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी केली आहे. तर याबाबत मत्स्यव्यवसाय अधिकारी बाबूलगावे यांना विचारणा केली असता, संबंधित राष्ट्रध्वजाची जावबदारी ही ठेकेदाराची असल्याचे सांगून, आपला यामध्ये काहीच दोष नसल्याचे सांगत हात वर केले आहे.
गस्त नौका ज्या विभागासाठी आणि ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत आहे, जावबदारी त्याचं अधिकाऱ्याची असते. यामुळे मत्स्यव्यवसाय अधिकारी यांनी आपला यात दोष नसल्याचे सांगून हात वर करण्याऐवजी नैतिक जावबदारी स्वीकारून, राजिनामा देणे गरजेचे होते.
मार्तंड नाखवा
फिशरमन काँग्रेस कोकण विभागीय उपाध्यक्ष
संबंधित गस्त नौका ही “एकविरा मरिन सर्व्हिसेस” यांच्याकडून भाडेतत्वावर घेतली असून, यावरील राष्ट्रध्वज, संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यांची परवानगी न घेता लावला होता. तर 28, 29 या तारखेला सागरी सुरक्षा कवच असल्याने, भारतीय नौदल, तटरक्षक दल, सीआयएसएफ चे अधिकारी या नौकेमधून गस्त घालत होते. जर ध्वज फाटक्या अवस्थेमध्ये असता तर त्या अधिकाऱ्यांनी नौकेमध्ये पाय ठेवला असता का?
सुरेश बाबूलगावे
मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी