BREAKING NEWS मुंबई गोवा महामार्गावर पेण नाजिक हमरापूर जवळ भीषण अपघात

पेण, प्रतिनिधी

गॅस ट्रॅक आणि पिकअप ट्रॅकमध्ये अपघात, अपघातामध्ये महिलेचा मृत्यू

   मुंबई गोवा महामार्गावर पेण नजिक हमरापूर फाटा ब्रीजवर पहाटे 4:15 वाजाता एच.पी. गॅस ट्रक क्र.MH 12 EQ 2208 व महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH 07 AJ 2682 मध्ये अपघात.देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन जात असताना एच.पी.गॅस ट्रकला मागून जोरदार टक्कर दिल्याने  महिंद्रा बोलेरो पिकअप मधील सुमित चंद्रकांत खवळे वय 28 रा.देवगड सिंधुदुर्ग हा गंभीर जखमी झाला, तर त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय 24 रा.देवगड सिंधुदुर्ग हीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी दोनही वाहने एकमेकांत अडकून असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघात झाल्याचे कळताच  देवदूत कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दादर सागरी पोलीस व पेण पोलीसांनी घटनास्थळी जावून अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page