प्रतिनिधी, श्वेता भोईर
बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र दिन विशेष ३० एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व १ मे रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीरासाठी सुतीका गृह मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, पनवेल यांचे सहकार्य लाभले. तर रक्तदान शिबीरासाठी स्वस्तिक ब्लड बँक ( कामोठे ) यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रभाकर निंबाळकर, अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, उपाध्यक्ष स्वप्निल मुटके, सचिव विशाल कावरे, उप सचिव श्वेता भोईर, पदाधिकारी समीर जाधव, अनिकेत जगताप, अनिरुद्ध जगताप इत्यादी उपस्थित होते. यावेळी बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे आरोग्य विभागात असेच कार्य करत राहण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला. अशाप्रकारे दोन्ही कार्यक्रम उत्स्फूर्तपणे संपन्न झाले.