रायगड जिल्ह्यामध्ये दोन अपघातांमध्ये एका महिलेचा मृत्यू तर नऊ जखमी

पेण, प्रतिनिधी

कोकणातून अंबा घेऊन येणाऱ्या पिकअप ट्रकने गॅस सिलेंडर भरलेल्या ट्रॅकला मागून धडक दिल्याने, पिकअपमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या अपघातामध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्याने, आठ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामुळे मुंबई-गोवा मार्गवर काहीकाळ वाहतुक ठप्प झाली होती.

    मुंबई-गोवा महामार्गवरील पेण तालुका हद्दीमध्ये हमारापूर फाट्याजवळ बुधवारी पहाटे पाच वाजता गॅस सिलेंडरने भरलेला ट्रॅक आणि पिकअप ट्रॅकमध्ये धडक होऊन, अपघात झाला.  कोकणातील देवगड येथून मुंबईकडे अंबा घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअपने गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात पहाटेच्या वेळीस चालकाला झोप लागली असल्याने झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतं आहे. मात्र अपघातामध्ये सुमित चंद्रकांत खवळे (28) रा. देवगड, सिंधुदुर्ग हा गंभीर जखमी झाला असून, त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे (24)  हिचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात स्थळी दोनही वाहणे एकमेकामध्ये अडकली असल्याने, वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. तर पेण हद्दीमधील डोलवी येथे जेएसडब्लू कंपनीची बस कामगारांना घेऊन जात असताना, तायर फुटल्याने पलटी झाली. या अपघातामध्ये बस मधून प्रवास करणाऱ्या अठरा कामगारंपैकी आठ जणांना गंभीर स्वरूपाची दुःखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सकाळच्या  वेळेस झालेल्या या अपघातामुळे मुंबई-गोवा मार्गवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page