अलिबाग, अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात घरफोडी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या चोरीचा तपास करणे रायगड पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.मात्र रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने या घरफोडी करणाऱ्या गुन्हेगार यांचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून घरफोडीत चोरी केलेला माल विकत घेणाऱ्या महिलेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख चोवीस हजार नव्यांणव रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करताहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात घरफोडी चोरीचं प्रमाण वाढलं होतं. दिवसागणिक घरफोडी चोरी जात असल्याने याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपास करण्याचे काम सुरू केले.अलिबाग पोलीस स्टेशन मधील गुन्हा रजिस्टर क्रमांक 92/2023, भा.द.वि .454, 457, 380 या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे चालू असताना तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार अमोल हंबीर यांस मिळालेल्या गोपनीय माहितीच्या व त्याआधारे पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून तपास पथकाने संशयीत व पुर्वीचा रेकार्ड आरोपी संदीप रामकेवल निशाद, (वय 25 वर्षे, रा. तळ्याजवळ, नवगावं, ता.अलिबाग, जिल्हा रायगड मूळ रा. देवढ, चांदा, ता.लबुआ, जिल्हा सुलतानपूर, राज्य उत्तरप्रदेश )यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.तसेच या गुन्ह्यातील काही मुद्देमाल आरोपी नंबर 2 संगीता हसाराम काजळे हिस विकला असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे आरोपीकडे केलेल्या अधिकच्या चौकशीमध्ये त्याने खालीलप्रमाणे घरफोडीचे 10 गुन्हे केल्याची कबुली दिली.
अलिबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 92/2023, भा.द.वि . 454, 457, 380,अलिबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक38/2023, भा.द.वि . 454, 457, 380,अलिबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 130/2023, भा.द.वि . 454, 457, 380,अलिबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक230/2022, भा.द.वि . 454, 457, 380 ,अलिबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 338/2023, भा.द.वि . 454, 457, 380,अलिबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 212/2021, भा.द.वि . 454, 457, 380 मांडवा सागरी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 82/2022, भा.द.वि . 454, 457, 380,मांडवा सागरी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 101/2022, भा.द.वि . 454, 457, 380, मांडवा सागरी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 61/2021, भा.द.वि . 454, 457, 380,मांडवा सागरी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक 63/2021, भा.द.वि . 454, 457, 380 आदी गुन्हे उघडकीस आले असून आरोपी संदीप रामकेवल निशाद यांच्याकडूनदोन लाख चोवीस हजार नव्यांणव रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून चोरीचा माल खरेदी करणारी संगीता आसाराम काजळे,( वय 39 वर्षे, रा.जितनगर, वयशेत, ता.अलिबाग, जिल्हा रायगड) हिला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, पोलीस हवालदार प्रशांत दबडे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, महिला पोलीस हवालदार अभियंती मोकल, महिला पोलीस नाईक पल्लवी चव्हाण, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे , पोलीस शिपाई अक्षय जगताप यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रशांत दबडे हे करीत आहेत .