युलू बाईकची दुरवस्था, वापर करून अडगळीत

पनवेल, जितिन शेट्टी

शहर प्रदुषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी छोट्या छोट्या अंतरावर जाण्याकरीता इंथनयुक्त वाहन न वापरता इंथनमुक्त सायकल अथवा इ-बाईकचा वापर करावा या अनुषंगाने शहरात ई-बाईक सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ही ई-बाईक सध्या वापरून अडगळीत टाकण्याचे प्रकार घडत आहे.

महापे येथे युलू बाईक वापरून बांधकाम असलेल्या ठिकाणी टाकून दिले आहे. शहरात अशा प्रकारे ई बाईकचा गैरवापर सुरू आहे.सध्या धावपळीच्या,तणाव, व्यापाच्या जीवनात बहुतांशी नागरिक सुदृढ राहण्यासाठी नित्याने चालणे, योगासने करणे यावर अधिक भर देत आहेत. आजच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गराड्यात नागरिकांना सायकलचा विसर पडला होता. तसेच काही नागरिकांची सायकलिंग करण्याची इच्छा ही असते,परंतु आजमितीला सायकल हे वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या सुदृढ आयुष्यासाठी सन २०१८पासून युलू सायकल त्यांनंतर युलू बाईक सुरू करण्यात आली. याला नागरिकांनाकडून भरभरून प्रतिसाद ही मिळत आहे. सध्या शहरात ३४६ ई बाईक सेवेत आहेत. अनेकांना या ई बाईक उपयुक्त ठरत असतानाच, दुसरीकडे त्यांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापरदेखील समोर येत आहे.शहरात युलू बाईकचा वापर नोकरदार, कामगार वर्गांसह अनेक गरजू तरुणांना होत आहे. कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी युलू बाईक उपयुक्त ठरत आहेत. मोबाईलमध्ये असलेल्या अँप्लिकेशनच्या मदतीने कोणीही युलू बाईकचा वापर करू शकतो. त्यासाठीचे शुल्क देखील खिशाला परवडणारे असल्याने वाढत्या पेट्रोल दराच्या तुलनेत अनेकांकडून युलू बाईकला पसंती मिळत आहे. मात्र आता याच युलू बाईकचा तरुणांकडून गैरवापर होताना दिसत आहे. महापे येथे कोणी अज्ञात व्यक्तीने वापर करून नाल्याचे बांधकाम सुरू आहे त्याठिकाणी टाकून दिली आहे. नवी मुंबई महापालिकेडून असे गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील शहरात युलू बाईकचा गैरवापर सुरूच आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page