जेएनपिटी, बातमीदार
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा धुतूम च्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून धुतूम गावचे सुपुत्र तथा जासई उप विभाग प्रमुख राजेश कडू यांनी शिवसैनिकांच्या माध्यमातून श्री साई मेडिकल ट्रस्ट संचालित श्री साई रक्त केंद्र यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन धुतूम गावात केले आहे. ही अभिमानाची बाब आहे.तरी सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या राजेश कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी धुतूम शिवसेना शाखेतून लोकहिताची कामे मार्गी लागण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांनी व्यक्त केले.
धुतूम शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचा लोकार्पण सोहळा व रक्तदान शिबिराचा शुभारंभ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांच्या उपस्थितीत धुतूम गावात पार पडला. समाज हितासाठी चळवळ करणारी धुतुम गावामधील सेना नेहमीच लोकहिताचे काम करत आली आहे. याचाच एक भाग म्हणून आजच्या शाखा लोकांर्पण सोहळ्याप्रसंगी रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हा संपर्क प्रमुख बबन दादा पाटील यांनी लोकांहींताची कामे मार्गी लागण्यासाठी काम केले पाहिजे, तर सामाजिक क्षेत्रामध्येही हिरहिरीने सहभाग घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर,उप तालुका प्रमुख कमलाकर पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण ठाकूर,जासई विभाग प्रमुख नारायण तांडेल, धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर,उपसरपंच सौ.कविता कुंदन पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.सुचिता राजन कडू, सौ. प्रेमनाथ अनंत ठाकूर, रविनाथ बाळाराम ठाकूर,उप विभाग प्रमुख राजन कडू, अमुत ठाकूर,माजी सरपंच शंकर ठाकूर सह शिवसैनिक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी, शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन अनेकांनी रक्तदान केले.