पानटपरी आणि स्कूटर चोरी प्रकरणातील आरोपीला कारावास

अलिबाग, अमूलकुमार जैन

तपासी आधिकारी सूर्यवंशी आणि पोहवा संतोष चव्हाण यांचे होत आहे कौतुक

म्हसळा शहरांतील केवळ ३ दिवसाच्या  बाजार पेठेत एक पानपट्टी स्टॉल दुकान चोरटयाने फोडणे आणि घरासमोरील स्कूटर चोरीच्या या तीन दिवसांतील २ घटनेमुळे शांतता प्रिय म्हसळेकर हादरले असतानाच दोनही गुन्ह्याचा यशस्वी तपास झाल्यामुळे म्हसळा कर सुखावले असूनयाबाबत वेलकम २ या पानस्टालचे मागील बाजूने चोरट्यानी दुकान फोडून किमान रु ४४ हजाराचा मुद्देमाल आणि रोकड चोरट्यानी लंपास केल्याच्या घटनेचा तपास पोहवा संतोष चव्हाण यांचेकडे होता. गुलीस्तान अपार्टमेंट मधून एक MH06 BJ 6169 या स्कूटर चोरोची घटनेचा तपास पोसई आर.टी.सूर्यवंशी यांच्या कडे होता, सूर्यवंशी यानी स्कूटर चोरी मध्ये खेड जिल्हा रत्नागिरी येथूनआरोपी  हैदर अझीझ पठाण याला मुद्देमालासह अटक करून सपोनी संदीपान सोनावणे यांच्या मार्गदर्शनाने हैदरला बोलते केले  आणि पानटपरीचा तपास करणाऱ्या पोहवा संतोष चव्हाण यांचे ताब्यात दिले असता, हैदरने पानटपरीच्या चोरीतील मुद्देमाल सुध्दा ताब्यात दिल्याने दोनही चोरीचा अखेर उलगडा झाला त्यामुळे म्हसळाकर सुखावले . पोलीस अधिकारी कर्मयान्यांचे कौतुक होत आहे.प्रथम वर्ग न्यायालय श्रीवर्धन यांचे न्यायालयांत दोन्हीही गुन्ह्यांमधील हैदर अझीझ पठाण या एकाच आरोपीने  कबुली दिल्याने , २वर्ष साधा करावस व१०००रु द्रव्यदंड शिक्षा , स्कूटर चोरीच्या गुन्ह्यांत 3 महिने साधा कारावस व २०००रु द्रव्यदंड शिक्षा  ठोठावली.श्रीवर्धन कोर्ट पैरवि पोहवा/ के.एस.जाधव .पो.ना. सुर्यकांत जाधव , पो.ह. राजेंद्र खाडे यानी मदत केली .

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page