अलिबाग, अमूलकुमार जैन
मुरुड अलिबाग विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नांदगाव हायस्कूल,काकलघर व शीघ्रे आदिवासी वाडी येथे आरोग्य तपासणी व शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जिल्हा रुग्णालय येथून डॉक्टरांचे खास पथक औषधांसह तैनात करण्यात आले होते.सदरील आरोग्य शिबिरासाठी रुग्णांना आण्यासाठी व नेण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये वही,पेन अन्य साहित्य मोफत देण्यात आले आहे.नांदगाव हायस्कूल येथे झालेल्या आरोग्य तपासणी मध्ये ४०० रुग्णनाची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषध देण्यात आली.तर शीघ्रे येथे सुद्धा २५० रुग्णनाची तपासणी करण्यात आली.तर काकलघर येथे २०० रुग्णांची तपासणी कऱण्यात आली आहे. तर सुमारे या तीन विभागात सुमारे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमासाठी ऍड.मनोज पाटील,उप तालुका प्रमुख मनीष पाटील,शिवसेनेचे नेते भाई सुर्वे,सामाजिक कार्यकर्ते सतीश तिवरेकर,माजी सरपंच मोअज्जम हसवारे,विभाग प्रमुख अमित कोळी,ग्रामपंचायत सदस्य अभिनव कोळी,मुरुड तालुका शिवसेना प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,दिनेश मिणमिने,नितेश पाटील,अविनाश शिंदे,विशाल,पाटील,योगेश जयस्वाल,दीपेश वरणकर,सरपंच शीघ्रे संतोष पाटील,उप तालुका प्रमुख मनोज कमाने आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते भाई सुर्वे यांनी सांगितले कि, आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर व शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला असून शेकडो लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.