रायगड जिल्ह्यात 2022 मध्ये वाहतूक विभागाने बेशिस्त वाहन चालकांकडून 62 लाख 96 हजार पाचशे रुपये दंड वसूल

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यात वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालविणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.आहे. सन२०२२ वर्षात तब्बल वीस हजार आठशे चौतीस बेशिस्त वाहनचालकांवर रायगड वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून ६२लाख ९६हजार५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सन२०२१ वर्षाच्या तुलनेत सन२०२२ वर्षात २२३०नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईचा व सहा लाख दहा हजार पाचशे इतका दंड कमी वसुल करण्यात आला आहे. वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असल्याने वाहतुकीला जिल्हयात काही प्रमाणात शिस्त लागत चित्र दिसत आहे.

रायगड जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचारी अधिकारी यांनी जिल्ह्यात सिग्नल मोडणे, वाहन चालविण्याचे परवाने नसणे, दुचाकींवरून सर्रास ट्रीपल सीट जाणे, अल्पवयीन मुलांकडे दुचाकी देणे, शहरात वेगात वाहने चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, सीटबेल्ट न लावणे अशा अनेक नियमांना हरताळ फासला जात आहे. हे नियम न पाळल्यामुळे शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होऊन त्यात अनेक जण ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून वाहनाचालकांवर कारवाई केली जाते; परंतु गेल्या काही वर्षांत बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईचा आकडाही वाढत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणारे केवळ रायगड जिल्ह्यात सन २०२१ मध्ये चोवीस हजार चौतीस बेशिस्त वाहनचालक यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून तब्बल एकोनऐंशी लाख सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.सन २०२२ मध्ये वीस हजार आठशे चार बेशिस्त वाहनचालक यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून तब्बल बासष्ट लाख ९६ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page