जनसेवा हीच खरी समाजसेवा- माजी सरपंच दिपेश वरणकर

अलिबाग, अमूलकुमार जैन

अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी ख-या अर्थाने गरीबांची सेवा केली आहे . मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुरुड तालुक्याच्या विकासासाठी अनेक लोकाभिमुख योजना राबुन ते जनतेच्या मनातले ताईत बनले आहेत.आमदाराचे प्रत्येक कार्य लोकांच्या उपयोगी पडणारे असुन हीच खरी लोकसेवा आहे असे प्रतिपादन वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिपेश वरणकर यांनी शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील नविवाडी येथील आदिवासी वाडी या ठिकाणी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व शैक्षणिक शालेय साहित्य वाटप कार्यक्रम वेळी बोलत होते.

               यावेळी मुरुड तालुका शिवसेना प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, शिघ्रे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष पाटील, आमदार समर्थक दिनेश मिणमिणे, डॉक्टर निचिकेत पाटील, डॉक्टर साहारा डोंगरकर, प्रथमेश राणे,नर्स राधिका सानप,तेलवडे सरपंच कल्पना पवार, उपसरपंच निलेश तांबडकर, आमदार समर्थक संदेश थळे, उपतालुकाप्रमुख-मनोज कमाने, सुविधा पाटील, निकिता गायकर, रेश्मा माळी, आदिंसह आदिवासी महिला व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
       यावेळी ६० महिलांची व मुलांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली व १५० शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले.
    सेवा ही निरपेक्ष असावी जे कार्य दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले त्याचं  कार्यपद्धतीने आगामी काळात शैक्षणिक सुविधा देण्याबरोबर लोकांना उपयोगी पडणारी आरोग्य सेवा पुराविण्याकडे आमचा कल राहणार आहे असे मत वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच - दिपेश वरणकर यांनी केले.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page