रक्तदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान – मानसी दळवी

अलिबाग, अमूलकुमार जैन

रक्तदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान मानले जाते, रक्ताची गरज सतत पूर्ण करण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या माजी प्रतोद मानसी दळवी यांनी अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त राजमळा येथे आयोजित रक्तदान शिबिरात केले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मानसी दळवी म्हणाल्या की, रक्तदान हे सर्वोत्तम दान आणि श्रेष्ठ कृत्य असून मानवतेसाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात रक्तदान केलेच पाहिजे. मानवाने दान केलेले रक्त एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवते आणि रक्तदात्यासाठी याहून अधिक आश्वासक काहीही असू शकत नाही.एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे. मधुमेह असलेले रुग्ण जर इन्शुलिन घेत असतील तर त्यांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. रक्तदानानंतर शरिरात रक्ताची पूर्ती २४ तासात होते. रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात.जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते.रक्तदान हेच जीवनदान आहे .रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, मग ते कुणाहीसाठी असो. समाज माध्यमांवरून असाध्य रोगांनी पीडित रुग्णांना रक्त मिळण्यासाठी केलेली आवाहने माझ्यापर्यंत येतात. त्यांच्यासाठी नेहमी रक्त उपलब्ध करणं ही आपली जबाबदारी आहे. रक्तपेढीत नेहमीच रक्ताचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे. “अनेक सेवाभावी संस्था, गैरसरकारी सामाजिक संस्था आणि सामान्य माणसांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. त्यामुळेच रायगड जिल्ह्यासाहित महाराष्ट्रात आवश्यक तेवढा रक्त साठा उपलब्ध होईल”, असं त्या म्हणाल्या. “मानवी दुःख कमी करण्यासाठी केव्हाही जे शक्य होईल ते करणे आणि तसे करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आपला उद्देश असला पाहिजे”.असे मानसी दळवी यांनी सांगितले.
रक्तदान शिबीरात अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमन पेढीचे अधिकारी कर्मचारी यांच्यासाहित थळ ग्रामपंचायत उपसरपंच अभिजित दळवी,ऍड.मनोज पाटील,विघ्नेश माळी, सलील मोकल,विशाल जुईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page