तळेगाव येथे भर दिवसा किशोर आवारे यांची गोळ्याघालून हत्या

लोणावळा (श्रावणी कामत)

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळीबार आणि वार झाल्याची धक्कादायक घटना

शुक्रवारी (दि. 12) दुपारी घडली. किशोर आवारे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी गेले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटून ते इमारतीच्या खाली आले. (Talegaon) नगरपरिषदेच्या समोर येताच चार जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आवारे यांच्यावर गोळीबार तसेच कोयत्याने वार करण्यात आले. यात आवारे यांना दोन गोळ्या लागल्या व उपचारासाठी नेताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page