मातीच्या भांड्याना मागणी वाढली

जेएनपिटी, बातमीदार

चिरनेर गावातील कुंभार समाज लागला कामाला

सध्या मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवला आहे.त्यामुळे माती पासुन बनवलेल्या भांड्याना मागणी वाढली आहे.याचा फायदा उठवत चिरनेर गावातील कुंभार समाजाच्या बांधवांनी मातीची भांडी बनविण्याकडे आपला मोर्चा वळविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावात कुंभार समाजाची ३२ कुटुंब हि पिढ्यानपिढ्या वास्तव करत आहेत.या समाजाचे उध्दरनिर्वाच मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणे आणि नागरीकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेत जमीनील माती पासून भांडी बनविणे हे आहे.परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्याची मागणी कमी कमी होत गेल्याने कुंभार समाजांवर त्याचा परिणाम झाला.तरी ही कुंभार समाजाच्या बांधवांनी आपला पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आजही सुरू ठेवला आहे.

 मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रँसवर तसेच टिलच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थाल चविष्ट नसल्याने व सदर शिजवलेले अन्न हे शरीराला ऊर्जा देणारे नसल्याने नागरिकांनी चूलीवर, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थाला जास्त पसंती दर्शविली आहे.तसेच वाढत्या उष्णतेत घागर ( मडका ) मधिल पाणी पिण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.एकंदरीत मातीच्या भांड्याना मागणी वाढली असल्याने चिरनेर गावातील कुंभार बांधवांनी भाकरी साठी आवश्यक असणारी खापरी,मटन किंवा मासळी बनवायला तवी,जोगळ्या,भिन, पाण्यासाठी घागर ( मडका) सह विविध प्रकारची मातीची भांडी बनवून ती भांडी पेढ्यात भाजून नंतर ती भांडी विक्री साठी ठेवली आहेत.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page