सिडकोच्या नैना प्राधिकरणाची अनाधिकृत बांधकामावर कारवाई

उरण, प्रतिनिधी

विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील पाणलोट क्षेत्रात एका विकासकानी अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार उरण तहसील व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिडकोच्या नैना प्राधिकरण विभागाकडे केली होती.त्या तक्रारीची दखल सिडकोच्या नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाने घेऊन सोमवारी ( दि१५) सदर बांधकामावर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे.त्यामुळे अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

   उरण तालुक्यातील विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील, पाणलोट क्षेत्रा जवळील सर्व्हे नंबर १९८ -१ व २ आणि सर्व्हे नंबर ३३/१ हि जमिन राठोड नामक विकासकानी संपादित केली होती. मात्र स्थानिक गावकरी, शेतकरी यांना विश्वासात न घेता सदर विकासकानी स्थानिक ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला घेऊन सदर जमिनीवर तसेच खाडीकिनारी पाणलोट क्षेत्राच्या जागेवर दगड माती, डेब्रिज चा भराव करण्यास सुरुवात केली.त्यामुळे मासेमारी करणाऱ्या व्यवसायिकांचे नुकसान झाले तसेच भरावामुळे खारफुटीची झाडे नष्ट होऊ लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी विंधणे ग्रामपंचायत,उरण तहसील कार्यालय,सिडको, नैना,प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीची दखल  सिडकोच्या नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाने घेऊन मागील महिन्यात ( सर्व्हे नंबर १९८-१व२ वरील ) अनाधिकृत चार मजली इमारतींवर कारवाईचा बुलडोझर फिरवला होता.

    मात्र सर्वसामान्य नागरिकांना घराची स्वप्न दाखवणाऱ्या व त्यांच्या कडून लाखो रुपये उकळणाऱ्या राठोड नामक विकासकांनी सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या या कारवाईला न जुमानता स्थानिक गाव पुढाऱ्यांना पैशाची आमिषे दाखवून  पुन्हा एकदा विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर ३३/१ वरील पाणलोट क्षेत्राच्या जागेवर तसेच कंठवली ग्रामस्थांच्या ग्रामदैवत असलेल्या जागेवर दगड, माती, डेब्रिज चा भराव टाकून अनाधिकृत बांधकाम सुरू केले.त्यामुळे खाडीकिनारी वरील खारफुटीची झाडे नष्ट होऊन, पाणलोट क्षेत्राची जागा बांधकामात वापरली गेली.त्यामुळे उरण तहसील व वन विभागाच्या तक्रारी ची दखल घेऊन सिडकोच्या नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाने सोमवारी ( दि१५) पुन्हा एकदा पोलीस फाट्यासह  कारवाईचा बडगा उगारला आहे.अशी माहिती सिडकोच्या नैना अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे.

कारवाई प्रसंगी सिडको नैना प्राधिकरण विभागाचे अधिकारी प्रताप नलावडे, नवनीत सोनावणे, प्रमोद पाटील सह नैनाचे इतर कर्मचारी तसेच उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुहास चव्हाण यांच्या सह तीन पोलीस अधिकारी, आठ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.या कारवाईचा धसका इतर अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांनी घेतला असून त्यांची धगधग वाढली असल्याचे सध्या गावकऱ्यांमध्ये संबोधले जात आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page