अपंग क्षेत्रात काम करण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी प्रमाण पत्र घेणे आवश्यक

अलिबाग, अमूलकुमार जैन

अपंग व्यक्ती (सामान संधी ,हक्कनचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग ) अधिनियम १९९५ च्या कायद्याप्रमाणे,स्वयंसेवी संस्थेनी तथा व्यक्तींनी अपंग क्षेत्रात कार्य करण्याकरिता प्रथम सक्षम अधिकारी यांचेकडून नोंदणी प्रमाण पत्र घेणे आणि त्याचे वेळेवर नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.

अपंग क्षेत्रात नोंदणी प्रमाण पत्र न घेता व त्यांचे नूतनीकरण न करता सुरू असलेल्या अपंगाच्या विशेष शाळा/कार्यशाळा या कायद्याप्रमाणे अनधिकृत असल्यामुळे कायदेशीरकारवाईस पात्र आहेत. अशा अपंगांच्या विशेष कार्यशाळा/शाळा चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. असा अनधिकृत विशेष अपंगाच्या शाळा /कार्यशाळेवर नियंत्रण नसल्यामुळे त्या ठिकाणी अपंग मुलाच्या शिक्षण पुनर्वसन व निवासाच्या दृष्टीनेयोग्य सुविधा उपलब्ध आहेत. याची खात्री नसलेल्या पालकांनी त्यांच्या पाल्याना असा विशेष अपंगाच्या विशेष कार्यशाळा /शाळांमध्ये प्रवेश घेणे देखील व पुनर्वसनाच्या दुर्ष्टीनेहिताचे नाही. तसेच अशा अपंगाच्या विशेष शाळा/कार्यशाळांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार संबंधित पालक आणि संस्था असतील.

रायगड जिल्यातील शासकीय मुकबधीर विद्यालय,अलिबाग, नवीन पनवेल येथील भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित मतिमंद मुलांची विशेष शाळा,नवीन पनवेल येथील रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट कर्णबधिर मुलांसाठी विशेष शाळा(निवासी),पनवेल तालुक्यातील क्रोपोलि येथील कै. रामचंद्र कुरुलकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित मतिमंद आदिवासी मुलांची कर्णबधिर विद्यालय तसेच कर्णबधिर विद्यालय,पनवेल तालुक्यातील कसलखंड येथील दातार इन्सिटट्यूट फॉर स्पेशल एज्युकेशन अँड हुमान ऑक्टिविटीज दिशा मतिमंद मुलांची शाळा,पेण येथे एकलव्य मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पनवेल खारघर येथील सतीश हावरे दिव्यांग सेंटर,खालापूर तालुक्यातील डॉ. कुंदा दोंदे मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र,खोपोली,कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मतिमंद मुलांची शाळा,खालापूर तालुक्यातील खोपोली येथील शालोम एज्युकेशन ट्रस्ट सालोम मतिमंद मुलांची शाळा, पेण येथील सूहीत जीवन ट्रस्ट सुमंगल मतिमंद मुलाची शाळा/कार्यशाळा,आई डे केअर सेंटर मतिमंद मुलांचे व्यसाय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट येथील पाठबळ सामाजिक विकास संस्था राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांची शाळा,माणगाव येथील सुयोग मेंटर्ली हॅंडीकॅप चॅरिटेबल ट्रस्टसुयोग मतिमंद मुलांची शाळा, उरण येथील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान संचलित स्वीकार मतिमंद मुलांची शाळा,रोहा येथीलल ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा, त्याचप्रमाणे कर्जत येथील विनोबा मिशन कर्णबधिर विद्यालय ह्या शाळा /कार्यशाळा कार्यरत असून नोंदणीप प्रमाण प्राप्त आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत असणाऱ्या अपंग विभागामार्फत आवाहन करण्यात येते कि , नोंदणी प्रमाण पत्र न घेतलेल्या व त्याचे नूतनीकरण न केलेल्या अनधिकृत अपंगांच्या विशेष शाळा /कार्यशाळांमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. नोंदणी प्रमाण प्राप्त अधिकृत अपंगाच्या विशेष शाळा /कार्यशाळा मधेच प्रवेश घ्यावेत .असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा मार्फत करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page