अलिबाग, अमूलकुमार जैन
राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या ठिकाणाहून होतेय अलिबाग मुरूड तालुक्यात गुटख्याची विक्री
रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पनवेल पासून थेट पोलादपूर, कशेडी पर्यन्त त्याच प्रमाणे नव्याने तयार होत असलेला श्रीवर्धन माणगाव,आगरदांडा पासून मांडाद माणगाव आणि तेथून थेट गोवा असा राष्ट्रीय महामार्ग आहे.तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबाग आणि मुरूड तालुक्यात मोठ्याप्रमाणात गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू असून याला पोलिसांचा वरदहस्त असल्याचे गुटखा विक्रेते यांचे म्हणणे आहे.
अलिबाग तालुक्यातील शहाबाजपासून थेट मुरुडच्या टोकापर्यंत गुटखा विक्री होत आहे .गुटखा विक्री करणारे व्यापारी हे राजरोसपणे गुटखा वाहतूक करीत असताना त्यांना काही त्रास होत नाही.मात्र छोटे छोटे पान टपरीवर गुटखा विक्रीचा फार्स सरास केला जातो.अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असून येथील बाजार पेठ येथे गुटख्याचा मोठा घाऊक व्यापारी आहे याची माहिती संबंधित विभागास आहे.मात्र त्याचे आणि संबंधित अधिकारी यांचे संबंध सलोख्याचे असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था सद्यस्थितीत आहेत.
रायगड जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दुर्गम व डोंगराळतालुका म्हणुन ओळखला जातो मात्रकाही अवैध धंदा करण्या-यांनी याचा गैरफायदा घेतला असल्याचे दिसत आहे. संपुर्ण जिल्ह्यात जाण्यासाठी छुपे रोड असल्याने गुटखा व्यापार करणा-या,नी याचा फायदा घेत या आडमार्गा नजीक असणाऱ्या ठिकाणी गुटखा मागवुन संपुर्ण जिल्ह्यात मालाची विक्री करीत असल्याचे दिसत आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग,मुरूड,पेण, म्हसळा, रोहा येथे गुटखा विक्री करणारे मोठे बकरे असून ते गुटखा आणून त्याची विक्री जिल्ह्यातील प्रत्येक त्यांच्या हस्तकामार्फत गुटख्याचा पुरवठा केला जात आहे.संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्या वरद हस्ताने गुटखा पुरवठा सुरळीत सुरू आहे.जिल्ह्याच्या मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग शहरात गुटख्याचे तीन मोठे पुरवठादार आहेत.याची माहिती पोलीस ठाण्यापासून जवळपास सर्व विभागाकडे आहे.मात्र कारवाई होत नाही हे विशेष. मात्र छोट्या दुकानदार यांच्यावर कारवाई होते.
जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी शाळा, बसस्थानक आदी भागात पानटपरी, किराणा दुकानांमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. अवैध गुटखाविक्री करणार्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याने पोलीस त्यांच्याकडे बोट दाखूवन कारवाई करत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. या अवैध विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे, यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. शासनाने गुटखा बंदीचा कायदा केला. मात्र बंदीमुळे सध्या गुटखा तिप्पट किंमत घेवून विकला जात आहे. स्थानिक माफीया गुटखा पॅकेटला कागद गुंडाळून विक्री करतात. गुटखा विक्री करणार्या टोळ्या जिल्ह्यात कार्यरत असल्यामुळे यावर कारवाई होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हसळा , माणगाव, पेन, महाड, पनवेल, वडखळ, अलिबाग, मुरूडसहित अनेक तालुक्यात गुटखा बंदीचा पूर्ण फज्जा उडाला असून शासनाची गुटखा बंदी खरच आहे का? असा गंभीर प्रश्न तालुक्यात विचारला जात आहे. गेल्या वर्षभरात लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आलेला आहे.
सर्वच पान टपर्यांवर गुटख्याची विक्री होत असून गुटखा विक्री करणार्यांचे पूर्ण रॅकेटच संपूर्ण र्जिल्ह्यात रिसरात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गुटखा खाणार्यांना गुटखा विक्रीची दुकाने सापडतात. मात्र अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना त्याचा पत्ता का लागत नाही? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुटखा चोरट्या मार्गाने आयात होतो आणि तो खुलेआम विकला जातो. अनेक गुटखा व्यापार्यांची मोठी गोडावून ही ग्रामीण भागात आहे. १८ वर्षाखालील कुणीही तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी विक्री करू नये असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानंतरही शाळांसमोर गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. शाळकरी मुलांना मुख्य लक्ष केले जात आहे. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस मनाई असतानाही शाळा परिसरात गुटखा विक्री होत आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. मात्र कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात ह्या राज्यामधून गुटखा रोज शेकडो प्रवाशी वाहतूक करणार्या ट्रॅव्हल्स बसेसमार्फत मुंबईत येत असतो. प्रवाशांचे सामान ठेवण्याकरिता ट्रॅव्हल्समध्येे मोठी जागा उपलब्ध असतेे. तसेच या विक्रेत्यांना रेल्वेचा फायदा घेत आहे.खासगी वाहतूकदारांना हाताशी धरुन शेजारील राज्यातून गुटख्याच्या गोणी तालुक्यात आणल्या जातात. सदर बसेस रात्रीचा प्रवास करून पहाटेच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होतात. त्यानंतर त्यांना सांगितलेल्या तालुक्यातील मुख्य मार्गापासून थोड्या अंतरावर हे बस चालक आपली बस उभी करतात. आणि तेथून नंतर मोठे होलसेलर हा गुटखा वाहनाने तालुक्यात रिटेलअरपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी होतात. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देवून झोपी गेलेल्या अन्न औषध प्रशासनाला जागे करून महाराष्ट्रात गुटखा बंदी खर्या अर्थाने सुरू करावी. जेणेकरून युवा पिढी या गुटख्यापासून दूर राहील अशी नागरिकांची मागणी आहे. कायद्यातील पळवाटांमुळे गुटखा बंदीचा फज्जा उडाला असून सर्वत्र अवैध विक्री सर्रास सुरू आहे. गेल्या काही वर्षात गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केल्यामुळे शासनाची गुटखा बंदी खरंच आहे का? असा गंभीर प्रश्न कारवाईसंदर्भात उपस्थित झाला आहे. विभागाने गंभीर व्हावे म्हसळा सहित सर्वच पानटपऱ्यांवर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि खर्ऱ्याची भरघोस विक्री सुरू आहे. ही विक्री अधिकारी आणि विक्रेत्यांचे संगनमत असल्याशिवाय शक्य नाही, असा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहे.मोठ्या कंपन्यांच्या गोदामावर धाडी टाकल्यास मोठे घबाड हाती लागू शकते. खर्रा, गुटखा सहज उपलब्ध रायगड मध्ये सर्वत्र गुटखा आणि खर्रा उपलब्ध आहेत. अलिबाग येथील पानटपरीचे मालक म्हणाले, एक दिवसाच्या धाडीने आमचे काहीही बिघडत नाही. हा धंदा बंद केला तर दुसरा कोणता करणार. खर्रा बंद करता, पण त्यापेक्षाही हानीकारक असलेली सिगारेट तात्काळ बंद करा, अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी केली. १८ वर्षांखालील कुणीही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहे. यापूर्वी राज्यात बंदीचा कायदा अधिक कडक करण्याचे सूतोवाच तत्कालीन व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केले होते. कायद्यात सुधारणा व त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंडात्मक व सक्तमजुरीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आहे. लगतच्या राज्यातून आवक सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवित महाराष्ट्रात लगतच्या राज्यातून गुटख्याची आवक सुरू आहे. बंदीचा लाभ घेत विक्रेत्यांनी गुटख्याची किंमत दुप्पट व तिपटीवर नेली आहे. गुटखा उत्पादनावर बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून येतो, हा गंभीर प्रश्न आहे. गुटखा खाणाऱ्यांना गुटखा विक्रीची ठिकाणे सापडतात, मात्र पोलिसांना किंवा अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे कोडे कायम आहे. पोलिसांनीही स्वयंस्फूर्तीने अवैध विक्रेत्यांवर कारवाई करावी. पोलीसच पानटपऱ्यांकडून खर्रा आणि गुटख्याची मागणी करीत असेल तर कारवाईची अपेक्षा कुणाकडून करणार, हा खरा प्रश्न आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या वरदहस्त असल्याने गुटख्याची चोरट्या मार्गाने आयात होते आणि तो विकलाही जातो आहे, अशी माहिती एका पान टपरी धारक याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.