वाढत्या उरणला सिसिटीव्ही चे सुरक्षा कवच मिळण्याची मागणी

उरण, प्रतिनिधी

उरण तालुका मराठी पत्रकार संघाची बंदराच्या सचिव तथा मुख्य प्रबंधक मनीषा जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

जेएनपीए बंदर आणि त्यावर आधारित उरण तालुक्यात निर्माण झालेल्या शेकडो प्रकल्पाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील लोकवर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे . या वाढत्या वस्तीच्या अनुषंगाने तालुक्यात काही अप्रिय घटना ही घडू लागल्या आहेत. या वाढत्या वर्दळीचा ताण हा पोलीस यंत्राणेवरही पडू लागला आहे. अशातच होणाऱ्या अप्रिय घटनांचा तपास लावण्याकामी पोलिसांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर जे एन पी ए बंदराने तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी आज उरण तालुका मराठी पत्रकार संघाने जे एन पी ए बंदराच्या मुख्य प्रबंधक मनीषा जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू , उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, आणि सरचिटणीस अजित पाटील उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेतून मनीषा जाधव यांनी देखील आपण या कामात पुढाकार घेऊन सी एस आर फंडातून जे एन पी ए विभागात तरी असे कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

    मुंबई बंदरावरील ताण कमी व्हावा यासाठी सिडाकोच्या माध्यमातून तिसऱ्या मुंबईची स्थापना करून, उरण तालुक्यामध्ये जेएनपीए बंदराची उभारणी करण्यात आली. आयात-निर्यातीच्या माध्यमातून व्यवसायातील आलेखाची शिखरे गाठत जेएनपीए बंदराने जगाच्या नकाशावर आपले स्थान कायम केले आहे. तर देशातील सर्वात मोठ्या अशा या बंदरामुळे उरण तालुकाच नव्हे तर येथील आजूबाजूच्या परिसराचे चित्र बदलले आहे. बंदराच्या माध्यमातून येथील भागात अनेक लहान, मोठे व्यवसाय सुरु झाले आहेत. या व्यवसायाना लागणारा कर्मचारी वर्ग देखील मोठा असून, दररोज स्थानिक तसेच इतर भागातून येणारा कामगारवर्ग मोठा आहे. जेएनपीए बंदरमुळे मागील चाळीस वर्षात उरण तालुक्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. तर नजीकच्या काळात या ठिकाणी उभे राहत असलेले चौथ्या बंदराचा दुसरा टप्पा आदी मुळे या ठिकाणी औद्योगिकरणा बरोबरच  नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  या नव्या बदलांच्या निमित्ताने चान्गल्या सोबतच अनेक वाईट बदल देखील निर्माण झाल्याचे अनेक गुन्ह्यातून आजवर उघड झाले आहे. यामुळे येथील भागात गुन्हेगारी प्रवृती देखील फोफावन्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्वाचा  ताण अपुऱ्या पोलीस यंत्रणेवर  येत आहे. तर उरण तालुका हा येथील प्रकल्पामूळे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील तालुका बनला आहे. आज उरण तालुक्याची ओळख ही जेएनपीए बंदर अशी होऊ पहात असताना,  बंदर व्यवस्थापनाने उरण तालुक्याच्या सुरक्षेची नैतिक जबाबदारी स्वीकारत उरण तालुक्याच्या पर्यायाने जेएनपीए बंदराच्या  सुरक्षेसाठी तालुक्याला सि्सिटिव्हीचे सुरक्षा कवच निर्माण करून द्यावे अशी विनंती उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदनातून केली आहे. या निमित्ताने प्रबंधक मनीषा जाधव यांच्या शी झालेल्या मनमोकळ्या चर्चेतून जाधव यांनी ही आपण सी एस आर च्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते उरण तालुक्यात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या निमित्ताने दिले आहे.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page